तुम्ही महत्वाचे आहात ........ कारण
स्वतःला चांगलं समजावून घेण्यासाठी, आत्मनिर्भरतेसाठी आणि उत्तम * शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशन आणि हिप्नोथेरपी सेवा बेळगावमध्ये उपलब्ध.
मनावेधामध्ये आम्ही आपले आदरयुक्त स्वागत करीत आहोत.
इथे आम्ही तुमचे सहानुभूतीपुर्वक तुम्हाला पूर्ण ताकदीने स्वीकारून, समजावून घेऊन मानसशास्त्रीय वैयक्तिक समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन, शैक्षणिक समुपदेशन तसेच हिप्नोथेरपी (संमोहन उपचार) सेवा प्रदान करतो की ज्यामुळे तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंब आव्हानांना, प्रसंगांना, समस्यांना यशस्वीपणे सामोरे जाऊन मात करून उत्तम मानसिक आरोग्य प्राप्त करू शकता.
डॉ. बी. एस. पाटील
M.A (मानसशास्त्र), Ph.D., M.S. (काउंसिलिंग व सायकोथेरपी)
मानसिक आरोग्यासाठी
विश्वास मानसोपचारतज्ञ — डॉ. बी. एस. पाटील
डॉ. बी. एस. पाटील हे बेळगाव (कर्नाटक) येथील अनुभवी मानसोपचारतज्ञ आणि प्रमाणित हिप्नोथेरपिस्ट आहेत. गेली 30 वर्षे ते लोकांना ताण-तणाव, चिंता, काळजी, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, नातेसंबंधातील अडचणी, कौटुंबिक समस्या आणि शैक्षणिक अपयश यासारख्या समस्येतून बाहेर येण्यासाठी मदत करत आहेत. त्यांची उपचारपद्धती पूर्ण शास्त्रीय आणि मानवतावादी मूल्य याचा सुंदर मिलाफ आहे.
त्यांनी M.A (Psychology), Ph.D. आणि M.S (Counselling & Psychotherapy) पदवी प्राप्त केली आहे. त्याच्या कामाचा मुख्य उद्देश (Focus) मनुष्य असा का वागतो? व्यक्तिचे वैयक्तिक, कौटुंबिक जीवन समस्या आणि शालेय महाविद्यालयीन इत्यादी पातळीवर निर्माण होणाऱ्या वर्तन, मनोव्यापार आणि मानसिक प्रक्रिया इत्यादीवर पूर्ण बिनाशर्त स्वीकार करून समुपदेशन करतात.
त्यांचा प्रत्येक सत्र रुग्णाला बिनाशर्त स्वीकार, रुग्णाशी एकरूप होऊन शारारिक व मानसिक सुरक्षितता, निःपक्षपाती समजावून घेणारे वातावरण देतो.
“ बिनाशर्त स्वीकारातून उपचाराची सुरुवात होते आणि प्रचंड समजुपनातून परिवर्तन घडते ”
आमच्या सेवा
आम्ही व्यक्ती, परिस्थिती आणि समस्या लक्षात घेऊन विशेष मानसशास्त्रीय समुपदेशन सेवा प्रदान करतो.
वैयक्तिक कॉऊन्सलिंग
वैयक्तिक समस्या आणि व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक, भावनिक अडचणींवर मात करून आत्मविकास साध्य करण्यास मदत.
कौटुंबिक कॉऊन्सलिंग
वैवाहिक, कौटुंबिक नात्यांमधील मतभेद, अपुरा संवाद बेबनाव, कलह सुधारणा व निराकरणासाठी
शैक्षणिक कॉऊन्सलिंग
एकाग्रता, स्वआदर, समरणशक्ती, विश्वास आणि आत्मविश्वास प्राप्त करून देऊन शैक्षणिक स्पर्धा रिअर यासारख्या आव्हानांवर समुपदेशन करून त्याच्या क्षमतेची ओळख करून देण्यास मदत - ‘तू हे करू शकतोस’.
हिप्नोथेरपी
समस्याग्रस्त व्यक्तीच्या अगाद अंतरमनाच्या अवस्थेत दडलेल्या भूतकाळीन घटनांचा शोध घेऊन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संमोहनाचा विशेष वापर करून उपचार
हे तुम्हाला ओळखीचे वाटते का?
आम्ही आमच्या क्लायंटना विविध मानसशास्त्रीय आणि भावनिक आव्हानांमध्ये मदत करतो.
- मन एकाग्र न होणे
- ताण – तणाव, चिंता, काळजी
- नकारात्मक विचार, नको असताना पुन्हा पुन्हा येणारे विचार, मन एकाग्र न होणे
- प्रचंड अस्वस्थता, गोंधळ, हतबलता
- मी काहीच करू शकत नाही…. १
- माझ्या हातुन काहीच होऊ शकत नाही १
- ‘नव्या व्यक्ति, न ठिकाण’ याची भिंती
- उगीचच वाटणारी निराधार भिती
- अनावश्यक भित्ती, विनाकारण वाटणारी प्रचंड भिती
- असुरक्षिततेची भावना, मला काहीतरी होईल, मी मरेन, माझं काही खरं नाही, आता मी संपलोय —-
- प्रचंड नैराश्य, चिडचिड वृत्ती, वैफल्यग्रस्तता संशयीकृती
- कमीपणाची भावना आणि नेहमी वाटतं माझ्यात काहीतरी कमी आहे.
- आत्मविश्वासाचा अभाव
- मनोदेहिक आजार (मानसिक कारणामुळे होणारे शारीरिक आजार)
- व्यसनाधिनता
- आत्महत्येचे विचार
तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही मदतीसाठी आहोत.
- वैवाहिक समस्या आणि मतभेद
- जोडीदारांमध्ये विश्वासाचा अभाव किंवा शंका
- एकमेकांवर दोष देणे आणि उणिवा शोधणे
- किरकोळ घरगुती गोष्टींवरून वेगळे होणे / भांडण होणे
- कुटुंबातून दूर ठेवणे
- मुलं ऐकत नाहीत
- हट्टीपणा
- कुटुंबातील सदस्याला असाध्य आजार
- विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणाव आणि करिअर निवडीबाबत मार्गदर्शन
- अभ्यासात अपयशी ठरत असलेल्या किंवा मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना मदत
- शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण
- परीक्षेची भीती आणि कामगिरीचे दडपण
- प्रेरणेचा अभाव आणि एकाग्रतेच्या समस्या
- करिअर निवडीत गोंधळ आणि निर्णय न घेता येणे
आमचे क्लायंट काय म्हणतात
आमच्या समुपदेशन सेवांचा लाभ घेतलेल्या लोकांचे अनुभव जाणून घ्या.
“या सत्रांमुळे माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळात मला स्पष्टता मिळाली. डॉ. पाटील यांचा दृष्टिकोन व्यावसायिक असूनही करुणामय आहे. मला मिळालेल्या सहाय्य आणि मार्गदर्शनाबद्दल मी खरोखर आभारी आहे.”
– अ.के., बेळगाव
